कार्यकारी अभियंत्यास नोटीस, प्रकल्प दुरूस्तीसाठी एक कोटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:18 AM2019-07-05T00:18:58+5:302019-07-05T00:19:42+5:30

शेलूद येथील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भिंतीतून पाणी जात आहे. याची पुसटशी कल्पनाही जालना पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे.

Notice to Executive Engineer, One Crore Need for Project Correction | कार्यकारी अभियंत्यास नोटीस, प्रकल्प दुरूस्तीसाठी एक कोटीची गरज

कार्यकारी अभियंत्यास नोटीस, प्रकल्प दुरूस्तीसाठी एक कोटीची गरज

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेलूद येथील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भिंतीतून पाणी जात आहे. याची पुसटशी कल्पनाही जालना पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही. ही गंभीर बाब असून, याचा खुलासा तातडीने कार्यकारी अभियंत्यांनी सादर करावा, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात भोकरदन तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेलूद येथील धामणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्याच्या क्षमतेपेक्षा त्या धरणात जास्त पाणीसाठा शिल्लक साठल्याने धरणाच्या भिंतीतून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तसेच जास्त पाणीसाठा झाल्याने धरण फुटण्याची भीतीही परिसरात निर्माण झाली होती. ही एवढी गंभीर बाब असतानाही जालना येथील पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेले नाही. ही दप्तरदिरंगाई असून, याचा खुलासा तातडीने कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांनी करावा अशी नोटीस गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार बजावली आहे.
एकूणच जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आमच्याकडे एक निम्न दुधना प्रकल्प, ७ मध्यम प्रकल्प आणि २६ लघु तलाव आहेत. त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी किमान एक कोटी रूपयांची गरज लागणार असल्याचे ते म्हणाले. तसा प्रस्ताव आपण वरिष्ठांकडे सादर केल्याचे ते म्हणाले. दरम्यान धामणा धरणात जो पाणीसाठा अतिरिक्त झाला आहे, त्या पाण्याच्या दाबामुळे धरणाच्या भिंतीतून पाणी गळती झाली आहे. धरण फुटेल एवढी भीती बाळगण्याचे कारण नाही, हे आपण यापूर्वीच सांगितले होते.
नागरिकांनी कुठेच भयभीत होऊ नये असे आपण बुधवारीच जिल्हाधिका-यांच्या दौ-या दरम्यान गावक-यांच्या बैठकीत सांगितले होते. परंतु अफवांमुळेही या परिसरात घबराट निर्माण झाली होती.
भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्प कोणत्या विभागा अंतर्गत येतो यावरूनही खुलासा करताना अधिका-यांची भंबेरी उडाली. जिल्हाधिका-यांनी प्रथम जालना पाटबंधारे विभागाला याची विचारणा केली असता, हा प्रकल्प आमच्या विभागाकडे नसल्याचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितले.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क करून हा प्रकल्प तुमच्या अखत्यारित येतो का असे विचारले असता, त्यांनीही नकार दिला. यामुळे पाटबंधारे विभागात कशी टोलवा- टोलवी चालते हे पुढे आले. विशेष म्हणजे ज्या विभागाचा हा प्रकल्प आहे.
त्यांनाच तो माहित नसल्याने जिल्हाधिकारी जाम चिडले होते. दरम्यान कार्यकारी अभियंता जाधव यांनी यापूर्वी सहायक अभियंता श्रेणी -१ म्हणून भोकरदनमध्ये काम केले आहे. असे असतानाही गोंधळामुळे त्यांना ही माहिती देतांना अडचण आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Notice to Executive Engineer, One Crore Need for Project Correction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.