तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:33 AM2019-05-15T00:33:42+5:302019-05-15T00:34:41+5:30

आठही तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Notice issued to Tehsildar, Group Development, Agriculture Officer | तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असताना रोजगार हमी योजनेतून जी कामे सुरू होणे अपेक्षित होते, ती सुरू न झाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अत्यंत महत्वाच्या मुद्यांकडे आठही तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर असताना, प्रशासन निवडणुकीच्या नावाखाली दुष्काळाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत होते. अनेकवेळा मागणी करूनही चारा छावणी सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे आयुक्त सुनील कंद्रेकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पुढे आली. या बैठकीत केंद्रेकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांकडून खुलासा मागवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. समाधानकारक खुलास न आल्यास विभागीय चौकशी होणार आहे.
प्रशासनाच्या चलता है... धोरणाचा पर्दाफाश
विशेष म्हणजे परतूर तालुक्यातील मजुरांनी मंगळवारीच मोर्चा काढून प्रशासनाच्या चलता है धोरणाचा पर्दाफाश केल्याचे दिसून येते. आज घडीला जिल्ह्यात २८८ कामे सुरू असून, या कामावर दहा हजार पेक्षा अधिक मजूर हजर असल्याचे सांगण्यात आले. या नोटीसीचे उत्तर संबंधित अधिका-यांनी तातडीने द्यायचे असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Notice issued to Tehsildar, Group Development, Agriculture Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.