अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:10 AM2017-12-18T01:10:17+5:302017-12-18T01:10:22+5:30
जालना शहरात विविध ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांना जिल्हाधिकायांनी नोटिसा बजावल्या असून, दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात विविध ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांना जिल्हाधिकायांनी नोटिसा बजावल्या असून, दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. कागदपत्रे व्यवस्थित आढळून आली तर त्यावर कारवाई होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तर धार्मिक स्थळे हटविताना उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन केलेल्या समितीत वक्फ बोर्डाच्या सदस्याचा समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शहरातील वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या धार्मिक स्थळांना पालिका प्रशासनाने हटविले. परंतु खाजगी जागांवर वा वाहतुकीस अडथळा ठरत नसलेल्या काही स्थळांवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले
आहे.
वातावरण तणावाचे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना नोटिसा बजावून दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास म्हटले आहे. त्यानंतर अनधिकृत अशा धार्मिक स्थळांना हटविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.