व्यापाऱ्यांना आता सरकारच देणार बिलबुक छापून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:03 AM2018-05-30T01:03:21+5:302018-05-30T01:03:21+5:30
भविष्यात व्यापा-यांना सरकारकडूनच बिलबुक छापून मिळणार असून, त्याची आॅनलाइन नोंदणी केल्यावर त्या तुलनेत हे बिलबुक व्यापा-यांना देण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जीएसटी नंतर आता केंद्र सरकारने ई-वेबिल प्रणाली लागू केली आहे. या प्रणालित कुठेही आणि केव्हाही ट्रक अथवा अन्य वाहन थांबवून त्यातील मालाची तसेच सोबत असलेल्या बिलाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासह भविष्यात व्यापा-यांना सरकारकडूनच बिलबुक छापून मिळणार असून, त्याची आॅनलाइन नोंदणी केल्यावर त्या तुलनेत हे बिलबुक व्यापा-यांना देण्यात येणार आहे.
एकूणच सध्या बाजारात खरीप हंगामाची लगबग दिसून येत आहे. बियाणे, खते तसेच शेती संबंधित इतर सािहत्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतक-यांची गर्दी दिसून येत आहे. यंदा चांगल्या हवामानाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी आशा वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये घसरलेले साखरेचे दर आता सरकारच्या नवीन धोरणामुळे हळूहळू वाढत आहेत. साखर कारखान्यातील दरापेक्षा खुल्या बाजारातील साखरेच्या दरात ३०० रूपयांनी तेजी आली आहे. ई-वेबिल देताना पाठवण्यात येणा-या व्यापा-याचा संपूर्ण तपशील द्यावा लागणार आहे. पेट्रेल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्व साहित्याचे दर हे वाहतुकीसाठी पाच ते दहा रूपयांनी वाढल्याने महागाईत भर पडत आहे.
जालना येथील मोंढ्यात सध्या गहू, ज्वारी, सोयाबीन तसेच गुळाची आवक चांगली आहे. तूरीची आवकही दररोज एक हजार पोती अशी आहे. धान उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम पोह्यांचे दरवाढण्यावर झाल्याचे सांगण्यात आले. तूर, मूग, मसूर डाळीत किंचितशी तेजी आहे, तर उडीद डाळीत ५०० रूपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. साबुदाण्याचे दरही वाढले आहेत.