आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:30 PM2024-10-15T13:30:17+5:302024-10-15T13:30:39+5:30

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी ब्ल्यू सफायर प्रोसेसिंग युनिट-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत होते. दरम्यान, उद्धवसेनेचे जालन्यातील नेते हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. 

Now your competition is only for the post of Leader of the Opposition; Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

जालना : आज वारी करावी लागतेय, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून. तुमचा चेहरा तुमच्या सहकाऱ्यांना चालत नाही. सहकारी मित्रपक्षाला चालत नाही तर महाराष्ट्राला कसा चालेल, असा सवाल करीत आता तुमची लढाई, तुमची स्पर्धा मुख्यमंत्रिपदासाठी नाही तर विरोधी पक्षनेतेपदासाठी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी ब्ल्यू सफायर प्रोसेसिंग युनिट-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत होते. दरम्यान, उद्धवसेनेचे जालन्यातील नेते हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. 

धनुष्यबाण धोक्यात आल्याने आम्ही उठाव केला. लोकसभेत आम्ही १३ जागांवर समोरासमोर लढलो. पैकी सात जागा जिंकल्या. तुमचा स्ट्राइक रेट ४० टक्के तर आमचा ४७ टक्के आहे. जनतेच्या मनातील सरकार आल्यापासून आजपर्यंत इतिहासात कोणी घेतले नाहीत इतके निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत, असेही ते म्हणाले.   
 

Web Title: Now your competition is only for the post of Leader of the Opposition; Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.