प्लास्टिक विरोधात न.प.ची कारवाई, १० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 01:11 AM2019-05-10T01:11:46+5:302019-05-10T01:12:24+5:30
नगर पालिकेच्या पथकाने बंदी असताना प्लास्टिकचा वापर करणाऱ्या चार व्यापा-यावंर कारवाई करून दहा हजारांचा दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर: नगर पालिकेच्या पथकाने बंदी असताना प्लास्टिकचा वापर करणाऱ्या चार व्यापा-यावंर कारवाई करून दहा हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
परतूर शहरात बंदी असतांना सर्रास प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. गुरूवारी मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांच्या आदेशान्वये पथक स्थापन करून अचानक प्लास्टिक बॅगचा वापर करणा-या विरूध्द मोहीम हाती घेण्यात आल्क़ यामध्ये गजानन प्रोव्हीजन, वेलकम कलेक्शन, वरद प्रोव्हीजन्स, तुळजाई या चार दुकानावर पथकाने पाहणी केली असता सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. यावरून या दुकान मालकाकडून एकूण दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी पथक प्रमुख अभियंता शेख, धरेकर यांनी हा दंड ठोठवला.