‘एनआरएचएम’च्या कर्मचाऱ्यांचा पगारीसाठी दिवाळीनंतर शिमगा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:47 AM2019-11-07T00:47:04+5:302019-11-07T00:47:21+5:30
एनआरएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या पगारीला बायोमेट्रिकमुळे चांगलीच कात्री लागली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एनआरएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन महिन्यांच्या पगारीला बायोमेट्रिकमुळे चांगलीच कात्री लागली आहे. त्यामुळे उसनवारीवर दिवाळी सण साजरा केलेले कर्मचारी हाती पडलेली पगार पाहून प्रशासनाच्या कारभाराबाबत शिमगा करीत आहेत, तर नगर पालिकेतर्गत असलेल्या ‘एएनएम’ (परिचारिका) यांनी मंगळवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्याकडे धाव घेऊन पगारीबाबत आपले गºहाणे मांडले.
जिल्हा रूग्णालयांतर्गत व जिल्हा परिषदेंतर्गत एनआरएचएम मध्ये जवळपास ४०० हून अधिक अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. शासनामार्फत राबविल्या जाणाºया विविध आरोग्य विषयक योजना या अधिकारी, कर्मचा-यांमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. मात्र, जिल्हा रूग्णालयांतर्गत कार्यरत या अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारी जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्या आणि ३०० वर अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारी वेळेवर न होण्याचा सिलसिला सुरू झाला. कधी बायामेट्रीक तर कधी वेळेवर अहवाल न येण्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, ऐन दिवाळी सारख्या सणातही सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याची पगार जिल्हा परिषद प्रशासनाने न केल्याने जिल्हा रूग्णालयांतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. अनेकांनी उसनवारीवर दिवाळी सारखा सण साजरा केला. मात्र, दिवाळीनंतर हाती पडलेली पगार पाहून प्रशासनाच्या नावे ‘शिमगा’ करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. काही जणांच्या ८ दिवसाच्या काही जणांच्या १५ दिवसाच्या तर अनेकांच्या २० हून अधिक दिवसांची पगार कपात झाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. तर काहींनी मोजकीच पगार हाती पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी संघटनेमार्फत वरिष्ठांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या.
पाठपुरावा सुरू आहे
एनआरएचएम अंतर्गत अधिकारी, कर्मचा-यांच्या पगारी वेळेत व्हाव्यात, यासाठी आम्ही सतत निवेदने दिली आहेत.मात्र, आमच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. बायोमेट्रीकमुळे अनेकांच्या गत दोन महिन्यांच्या पगारी कपात करण्यात आल्या आहेत.
आम्ही कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीनुसार पत्र संबंधितांना देऊन पगारीसाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मुंडे, सचिव मनोज जाधव यांनी सांगितले.