कोरोनाबाधितांची संख्या २०२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:35+5:302021-03-06T04:29:35+5:30

जालना : जिल्ह्यातील तब्बल २०२ जणांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे, तर उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ११९ जणांना रुग्णालयातून ...

The number of corona sufferers is 202 | कोरोनाबाधितांची संख्या २०२ वर

कोरोनाबाधितांची संख्या २०२ वर

Next

जालना : जिल्ह्यातील तब्बल २०२ जणांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे, तर उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ११९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. बाधितांमध्ये जालना शहरातीलच ११९ जणांचा समावेश आहे.

गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल २०२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, जालना शहरातीलच ११९ जणांचा यात समावेश आहे, तसेच बोरखेडी -२, इंदेवाडी -१, अबुडा -१, बाजी उम्रद -१, नेर -१, अरडवडगांव -१, खरपुडी -२, वानखेडा -१, कारला -१ व घेटुळी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे -१, परतूर शहर -५, वरफलवाडी -१, घनसावंगी शहर -१, पिंपळगांव -१, रांजणी -३, भादरगांव -१, डोनवडे -१, सरफ गव्हाण येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबड शहर -१, अंकुशनगर -४, जळगांव बु.-१, बरसवाडा-१, हतगांव -५, हस्तपोखरी -२, मठ पिंपळगांव -२, पाथरवाला बु. -१, झोडेगांव येथील पाच जणांना बाधा झाली आहे. बदनापूर शहर -१, घोटण -१, चितोडा -१, हिवरा दाभाडी -१, धोपटेश्वर -१, जाफराबाद तालुक्यातील अरडखेडा -१, वरखेडा -१, दहिगांव -१, माहोरा येथील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. भोकरदन तालुक्यातील सावरखेडा -२, बाभुळगांव -१, चिंचोली -२, राजूर -१, तळणी -१, शिरसगांव -१, एलोरापुर -१,बुलडाणा -१३, औरंगाबाद -१, यवतमाळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर अँटिजन तपासणीद्वारे २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बाधितांची संख्या १६ हजारावर

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार २३१ वर गेली असून, त्यातील ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर १४ हजार ८२१ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या कोविड रुग्णालयात ॲक्टिव्ह १,००८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

Web Title: The number of corona sufferers is 202

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.