बालकामगार प्रकल्पातील महिलांचे कार्य उद्दिष्टपूर्ततेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:15 AM2019-01-30T01:15:49+5:302019-01-30T01:16:22+5:30

बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले

Objectives of women towards completion in child labour projects | बालकामगार प्रकल्पातील महिलांचे कार्य उद्दिष्टपूर्ततेकडे

बालकामगार प्रकल्पातील महिलांचे कार्य उद्दिष्टपूर्ततेकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बालकामगार प्रकल्प यशस्वी करण्यात या प्रकल्पातील महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापुढेही असेच चांगले काम केल्यास जिल्ह्यातून बालकामगारांचे उच्चाटन होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, कामगार अधिकारी टी.ई. कराड, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, विधितज्ज्ञ अश्विनी धन्नावत, स्त्रीरोग तज्ज्ञ अंजली हुसे, दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विद्या पटवारी, जे.ई.एस. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संध्या रोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून बालकामगार विद्यार्थ्यानी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, कार्यक्रमाचे नियोजन पाहून तसेच बालकामगार प्रकल्पातील महिला कर्मचाºयांचे कार्य व शिस्त बघून सांगितले की, खरोखरच हा बालकामगार प्रकल्प उद्दिष्टपूर्ततेकडे जात आहे. आज महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे, हे त्यांनी महिला संदर्भातील विविध कायदे याचे उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगा सोबत पुढील येणा-या काळात महत्वकांक्षी प्रकल्प व महत्वाकांक्षी उपक्रम राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पासोबत राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महिला व बालकांसंदर्भात प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून त्याचा प्रत्यक्ष लाभ प्रकल्पास देण्याची ग्वाही दिली.
सूत्रसंचालन मो. फरहीन तर आभार प्रदर्शन छाया सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील कार्यक्रम व्यवस्थापक रामदास जगताप, व्यवसायिक प्रशिक्षक उषा मगर, रेखा बोर्डे, रुपाली कोकणे, दुर्गा शेळके, अर्चना घाटेकर, शेख समीना, रूचिरा धोत्रे, पुष्पा कापसे, शेख अरेफा, प्रतिभा सुरडकर, दत्तात्रय रायमल, राजू राठोड, शुभांगी रत्नपारखी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.जालन्यात २००५ पासून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती मनोज देशमुख यांनी देऊन, यातून अनेकांना लाभ झाला आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खपले म्हणाले की, प्रकल्पाकरिता भविष्यात प्रशासनास्तरावर आवश्यक मदत करण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकामध्ये प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जालना हा महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण असून, प्रकल्पात महिला कर्मचारी जास्त असल्यामुळेच त्यांच्या माध्यमातून बालकामगार विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासकीय व अशासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळून दिला आहे. यावेळी डॉ. अंजली हुसे, विधि तज्ज्ञ अश्विनी धन्नावत, विद्या पटवारी, संध्या रोटकर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

Web Title: Objectives of women towards completion in child labour projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.