वखारी येथील शेंद्री बोंडअळी निर्मूलन प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:52 IST2020-01-06T00:51:44+5:302020-01-06T00:52:14+5:30
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

वखारी येथील शेंद्री बोंडअळी निर्मूलन प्रकल्पाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तीन वर्षांपूर्वी शेंद्री बोंडअळीने कापूस उत्पादकांना जेरीस आणले होते. या अळीच्या हल्ल्यामुळे कापसाचे उत्पादन कमी होऊन मोठा फटका कापूस उत्पादकांना बसला होता. यामुळे या अळीचे उच्चाटन करणे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी जालना तालुक्यातील वखारी या गावाची कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयसीएआर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला होता.
या वखारी येथील विशेष प्रकल्पाला रविवारी दिल्ली येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने भेट देऊन एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. शेंद्री बोंडअळीमुळे झालेले नुकसान कमी करण्यासाठी या अळीवर नियंत्रण कसे मिळवावे, याबद्दलचे शास्त्रशुध्द धडे आयसीएआर आणि जालन्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिले. (पान २ वर)
यावेळी वखारी येथील प्रगतशील शेतकरी निवृत्ती घुले, बळीराम घुले, सोपान घुले, रमेश काळे, श्रीराम आटोळे, रामेश्वर घुले, गजानन घुले, प्रल्हाद खैरे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष कापसाची पाहणी केली.
बोंडअळी निर्मूलनासाठी राबविलेले उपक्रम या ठिकाणी प्रत्यक्षात आल्याने यंदा कापूस उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.