चौघांना बाधा, तिघे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:48+5:302021-09-16T04:37:48+5:30
जालना : जिल्हा प्रशासनास बुधवारी प्राप्त अहवालात नवीन चार रुग्ण आढळले आहेत. तर उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात ...
जालना : जिल्हा प्रशासनास बुधवारी प्राप्त अहवालात नवीन चार रुग्ण आढळले आहेत. तर उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३२ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनास बुधवारी ३२८ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. यात आरटीपीसीआरच्या २८१ तपासणी अहवालात चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याचा पॉझिटिव्हिटी रेट १.४ आहे. तर ॲँटिजनच्या ४७ तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. एकूण पॉझिटिव्हिटी रेट हा १.२२ आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील एक, परतूर शहरातील एक, बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथील एक व भाेकरदन तालुक्यातील राजूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ७४६ वर गेली असून, त्यातील ११९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार ५२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.