अधिकाऱ्यांनो केवळ खुर्च्या उबवू नका... दानवेंनी भरला दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:20+5:302021-01-23T04:32:20+5:30
यासह घरकुलाचा मुदा, शिक्षण विभाग यावरही दानवेंनी झाडाझडती घेतली. जिल्ह्यातील अनेक शाळा खोल्यांची बिकट अवस्था झाली असल्याचे सांगून ...
यासह घरकुलाचा मुदा, शिक्षण विभाग यावरही दानवेंनी झाडाझडती घेतली. जिल्ह्यातील अनेक शाळा खोल्यांची बिकट अवस्था झाली असल्याचे सांगून याकडे शिक्षण विभागााचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याच्या मुद्यावरून शिक्षणाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघणी केली. वीज वितरण कंपनीत नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांची देखील दानवेंनी चांगलीच फिरकी घेतली. तुम्ही येऊन किती महिने झाले, अशी विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याने सहा महिने झाल्याचे सांगितले. योवळी आढावा बैठक घेतली का, असा सवाल करून पुढच्या बैठकीत नीट अभ्यास करून येण्याचे सांगितले. एकूणच शुक्रवारी दानवेंनी आढावा बैठकीत अनेक मुद्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने बैठकीनंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये याबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
चौकट
माझी चौथीची शाळाही आहे तशीच....
आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीला होतो. त्यावेळी ती शाळा जशी होती, ती आजही तशीच आहे. निजाम काळातील त्या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने का पाठविला नाही. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा दौरा करून मोडकळीस आलेल्या शाळांची पाहणी करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले.