साडेदहानंतरही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:24 AM2020-03-19T00:24:27+5:302020-03-19T00:25:43+5:30

लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले.

Officers, employees coming late in offices | साडेदहानंतरही शुकशुकाट

साडेदहानंतरही शुकशुकाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : २९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाच्या १८ दिवसांनंतर म्हणजे बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयात लोकमतच्या चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रकार उघडकीस आले. साडेदहानंतरही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.
राज्य शासनाने सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळी सकाळी ९.४५ ठेवण्यात आली आहे. तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ ही निश्चित करण्यात आली आहे. निर्णयाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील कार्यालयांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. यात अनेक कर्मचारी व अधिकारी उशिरा कार्यालयात आल्याचे उघड झाले. या निर्णयाला जवळपास १८ दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी अधिकारी व कर्मचारी करत नसल्याचे ‘लोकमत’ने जिल्हा परिषदेत बुधवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
बुधवारी सकाळी १० वाजता झेडपीतील सर्व विभागांची पाहणी केली असता, जवळपास सर्वच विभागात शिपाई साफसफाई करताना दिसून आले.
केवळ सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे व माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी गरूड हे दोन्ही अधिकारी कार्यालयात हजर होते.
मुख्य कार्यकारी अधिका-यांसह इतर सर्व विभागांचे विभागप्रमुख १० वाजता कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले.
अधिकारीच गैरहजर असल्याने प्रत्येक विभागात एक किंवा दोन कर्मचारी दिसून आले. यावरून शासनाने घेतलेल्या निर्णयाला अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र जालना जिल्हा परिषदेतून समोर येत आहे.
कर्मचा-यांचे सुट्यांकडे लक्ष
२९ फेब्रुवारीपासून ५ दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्यामुळे कार्यालयात येण्याची वेळ सकाळी ९.४५ तर कार्यालय सोडण्याची वेळ ही ६.१५ मिनिटे ही निश्चित करण्यात आली आहे. पहिले चार ते पाच दिवस अधिकारी व कर्मचा-यांनी नियम पाळला.
त्यानंतर कोणीच बहुतांश कर्मचारी मर्जी प्रमाणे कार्यालयात ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही सर्वच कर्मचारी शनिवार व रविवारच्या सुट्यांची वाट पाहत राहतात.
दरम्यान, अद्यापही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी उशीरा आलेल्या कर्मचारी व अधिका-यांवर कारवाई केली नाही.

Web Title: Officers, employees coming late in offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.