वृद्ध महिलेचे चोरी गेलेले ५० हजार रुपये दिले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:21+5:302021-09-11T04:30:21+5:30

जालना : घरी झाडूपोचा करण्यास येणाऱ्या एका महिलेने कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये चोरून नेले होते. पैसे गेल्यानंतर त्या ...

The old woman returned the stolen Rs 50,000 | वृद्ध महिलेचे चोरी गेलेले ५० हजार रुपये दिले परत

वृद्ध महिलेचे चोरी गेलेले ५० हजार रुपये दिले परत

googlenewsNext

जालना : घरी झाडूपोचा करण्यास येणाऱ्या एका महिलेने कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये चोरून नेले होते. पैसे गेल्यानंतर त्या घरातील वृद्धेला ही बाब समजताच तिने सदर बाजार पोलिसांना या चाेरीची माहिती दिली हाेती. आरोपी महिलेला शोधून तिच्याकडून ती रक्कम मिळवून वृद्धेला दिली आहे.

जालना शहरातील परमेश्वरीबाई जयरामदास गोयल (७७) या दुसऱ्या मजल्यावर एकटीच राहतात. दरम्यान, एक अनोळखी महिलेने येऊन तुमचे धुणीभांडी करून देत जाईन, असे आश्वासन दिले. काही दिवस येऊन कामही केले ; परंतु एके दिवशी तिने कपाटातून ५० हजार रुपये चोरले होते. ही महिला पाेलीस ठाण्यात आल्यानंतर तिने हा प्रकार पोलिसांना सांगितला हाेता. पोलिसांनी धुणे काम करणाऱ्या महिलेची चौकशी करून त्या वृद्धेची रक्कम परत मिळवून दिली आहे. ही कारवाई पीआय अनिरुद्ध नांदेडकर, गणेश झलवार, रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, समाधान तेलंग्रे, धनाजी कावळे, रामेश्वर जाधव, सोमनाथ उबाळे, योगेश पठाडे, दीपक घुगे, कमल गिरी, सुमित्रा अंभोरे, प्रदीप आव्हाड यांनी पार पाडली आहे.

Web Title: The old woman returned the stolen Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.