जालन्यात 'हवाला’चे ७ लाख रुपये घेवून जाणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 19:06 IST2019-01-12T19:05:49+5:302019-01-12T19:06:55+5:30
उमेश पन्नालाल अग्रवाल (रा. व्यंकटेशनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे.

जालन्यात 'हवाला’चे ७ लाख रुपये घेवून जाणारा जेरबंद
जालना : शहरातील गुरुबचन चौक परिसरातून ‘हवाला’चे ७ लाख ५७ हजार २०० रुपये घेवून जाणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. उमेश पन्नालाल अग्रवाल (रा. व्यंकटेशनगर, जालना) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, शहरातील गुरुबचन चौक भागात एक इसम हा मोठ्या प्रमाणात नोटा बाळगत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन सदरील ठिकाणी जावून त्याला शोधून त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव उमेश पन्नालाल अग्रवाल सांगितले. त्यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात ७ लाख ५७ हजार २०० मिळून आले. याबाबत विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने सदरील रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. यशवंत जाधव, पोहेकॉ. स्कॉट पोकॉ प्रदिप घोडके, विशाल काळे, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे यांनी केली.