अंगणवाडी सेविकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:06+5:302021-09-25T04:32:06+5:30

देऊळगावराजा : शासनाने दिलेले मोबाइल निकृष्ट असल्याने अंगणवाडी सेविकांनी २३ ऑगस्टला ते मोबाइल संबंधित कार्यालयाला जमा केले होते. परंतु ...

One day strike of Anganwadi workers | अंगणवाडी सेविकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

Next

देऊळगावराजा : शासनाने दिलेले मोबाइल निकृष्ट असल्याने अंगणवाडी सेविकांनी २३ ऑगस्टला ते मोबाइल संबंधित कार्यालयाला जमा केले होते. परंतु बरेच दिवस झाल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्याने शुक्रवारी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शासनाने अंगणवाडी केंद्राचा बहुतांश कारभार हा ऑनलाइन करण्यात आला आहे. शासकीय कामकाज करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल पुरवठा करण्यात आला होता. परंतु सदर मोबाइलमध्ये अत्यंत कमी डाटा संकलन असल्यामुळे वारंवार सदर मोबाइल बंद पडत होते. पोषण ट्रेकर्स ॲप्स अंतर्गत अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज करणे शासनाने सक्तीचे केले होते. मात्र सदर मोबाइलमध्ये कमी रॅम असल्यामुळे हे ॲप्स डाउनलोड होत नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्या खासगी मोबाइलचा आधार घ्यावा लागतो.

अंगणवाडी सेविकांना दिलेल्या ॲप्समध्येही अनेक त्रुटी आहेत. डिलीट पर्याय नसणे वर्गवारी आणि लाभार्थी घटनांना बदलणे दैनंदिन करण्याचे काम आणि द्यावयाच्या कोणतेही मार्गदर्शन न येणे माहिती भरण्याची पद्धत अतिशय किचकट असणे अशा त्रुटीमुळे कामात मदत होण्याऐवजी त्रास वाढला होता. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी असताना इंग्रजीमध्ये माहिती भरणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अवघड जात होते. प्रोत्साहन भत्ता नियमित तालुका कार्यालयातून देण्यात येत नाही आदी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारी सोडविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी अंगणवाडी संघटनेच्या तालुका सचिव लक्ष्मीबाई खरात, सुनीता काळे, शीला गिते, उषा साप्ते, मंदाताई डोईफोडे, शोभा जाधव, संगीता मोरे, सारिका काळे, सुनीता जायभाये, उषा मगर, मंगल मुंडे, संगीता दहातोंडे, संगीता गवई, गोदावरी वाघ, रेणुका पोटे, स्वाती सोनवणे व इतरांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: One day strike of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.