ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या स्फोटात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:56 PM2019-06-18T23:56:06+5:302019-06-18T23:56:20+5:30

रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ब्लास्टिंग ट्रॅक्टरमधील जिलेटिनच्या कांड्यांचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश लिंगसे या ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

One killed in Blasting tractor explosion | ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या स्फोटात एक ठार

ब्लास्टिंग ट्रॅक्टरच्या स्फोटात एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : रस्त्याच्या कडेला उभारलेल्या ब्लास्टिंग ट्रॅक्टरमधील जिलेटिनच्या कांड्यांचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश लिंगसे या ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना घनसावंगी तालुक्यातील लिंगसेवाडी शिवारात सोमवारी रात्री घडली.
गोदाकाटवर असणाऱ्या लिंगसेवाडी येथील शेतकरी नारायण पवार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू आहे.
या विहिरीच्या कामासाठी गेवराई तालुक्यातील रुईचीवाडी येथील लक्ष्मण लाड यांचे ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर (क्र. एम.एच. १७- ए.व्ही. ६१३७) सोमवारी
गावावर शोककळा
ट्रॅक्टरच्या स्फोटात मयत झालेला ऋषिकेश हा गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीत शिक्षण घेत होता. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. मयत मुलाच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री आले होते. या विहिरीतील ब्लास्टिंगचे काम करून ट्रॅक्टर घेऊन चालक रस्त्यावर आला. हे ट्रॅक्टर परमेश्वर लिंगसे यांच्या शेताजवळ उभा करून चालक इतर कामासाठी बाजूला गेला. त्याचवेळी अचानक या ट्रॅक्टरमध्ये असणाºया जिलेटिनचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या ट्रॅक्टरचे तुकडे झाले. ट्रॅक्टरजवळ असणारे पल्लवी भिमग लिंगसे (४), ऋषिकेश शंकर लिंगसे (८), विजय संतोष पवार (वय २६) व नारायण कचरु पवार (२२) हे गंभीर जखमी झाले. घटना परमेश्वर सखाराम लिंगसे यांच्या शेताजवळ झाली. या घटनेत ऋषिकेश लिंगसे हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबादकडे नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. इतर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तीर्थपुरी येथील पोलीस चौकीचे सपोउपनि. नागरगोजे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Web Title: One killed in Blasting tractor explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.