एकाचा मृत्यू, सहा जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:12+5:302021-07-19T04:20:12+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला, तर सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त ...
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला, तर सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या सात जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
रविवारी जिल्हा रुग्णालयास एकूण २,६०९ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२३ आहे. आरटीपीसीआरच्या २,१३८ अहवालात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर अँटिजन तपासणीच्या ४७१ अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये घनसावंगी तालुक्यातील भोगगाव १, उढाण कंडारी १, अंबड तालुक्यातील कंडारी १, चर्मापुरी २, पि. सिरसगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ३५५ वर गेली असून, त्यातील १,१७६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर ६० हजार १२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, अंबड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात दोघांवर उपचार सुरू आहेत.