कर्जमुक्तीत एक लाख ३० हजार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:44 PM2020-02-29T23:44:23+5:302020-02-29T23:45:07+5:30

शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

One lakh 5 thousand farmers in debt relief | कर्जमुक्तीत एक लाख ३० हजार शेतकरी

कर्जमुक्तीत एक लाख ३० हजार शेतकरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये प्रसिध्द झाली आहेत. शनिवारी प्रसिध्द झालेल्या दुस-या यादीत ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर शनिवारी दुपारपर्यंत १७०० हून अधिक शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे.
महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत ज्या शेतक-यांचे बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. त्या शेतक-यांचे आधार क्रमांक संलग्निकरण करून घेण्यात आले. त्यानंतर शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर १ लाख ८१ हजार शेतक-यांची नावे अपलोड करण्यात आली होती. २४ फेब्रुवारी रोजी प्राथमिक टप्प्यात घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी या दोन गावांमधील ११०२ शेतक-यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली होती.
शनिवारी २९ फेब्रुवारी रोजी दुसरी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या दुस-या यादीत जालना जिल्ह्यातील ९४५ गावातील १ लाख २९ हजार ५६ शेतक-यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अंबड तालुक्यातील १३७ गावातील १९ हजार २९९, बदनापूर तालुक्यातील ९० गावातील १२ हजार ३५१ शेतकरी, भोकरदन तालुक्यातील १५२ गावातील २३ हजार ९८० शेतकरी, घनसावंगी तालुक्यातील ११४ गावातील १६ हजार ७२ शेतकरी, जाफराबाद तालुक्यातील १०३ गावातील १५ हजार ६४८ शेतकरी, जालना तालुक्यातील १४३ गावातील १९ हजार ४४३ शेतकरी, मंठा तालुक्यातील ११२ गावांमधील १० हजार ०६ शेतकरी तर परतूर तालुक्यातील ९७ गावातील १३ हजार ३५९ शेतक-यांचा या दोन्ही यादीत समावेश करण्यात आला आहे. कर्जमुक्तीच्या दोन्ही याद्यांमध्ये जालना जिल्ह्यातील १ लाख ३० हजार १५८ शेतक-यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. याद्या गावस्तरावर प्रसिध्द झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरणासाठी आपलं सरकार केंद्रावर एकच गर्दी केली होती.
कर्जमुक्तीची दुसरी यादी शनिवारी प्रसिध्द करण्यात आली. या यादीत आपले नाव आल्याचे समजताच गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथील गंगूबाई भगवान जोशी या शेतकरी महिलेने आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला. या योजनेंतर्गत त्यांचे ७१ हजार ९२ रूपयांचे कर्ज माफ झाले आहे.
१११३ केंद्रावर प्रक्रिया
कर्जमुक्तीच्या याद्या प्रसिध्द केल्यानंतर जिल्ह्यातील १११३ आपलं सरकार केंद्रावर शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करून घेतले जात आहे. आधार प्रमाणिकरणासाठी जाताना शेतक-यांनी यादीत आपल्या आपल्या नावासमोर आलेला विशिष्ट क्रमांक, आपले बँकेतील कर्ज खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईल सोबत नेणे गरजेचे आहे.
आधार क्रमांकाच्या ३६ तक्रारी
कर्जमाफीच्या पहिल्या यादीत आधार क्रमांक चुकल्याबाबत ३६ आॅनलाईन तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. पैकी ५ तक्रारींचे निरसण करण्यात आले आहे. तर ४ तक्रारी जिल्हा समितीकडे प्रलंबित आहेत. तर २७ तक्रारी तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत. यात बदनापूर तालुक्यात ३, भोकरदन २, घनसावंगी १५, जाफराबाद ५, जालना व परतूर तालुक्यातून प्रत्येकी १ अशा एकूण २७ तक्रारी आहेत. एकूण ३१ तक्रारींचा निपटारा होणे बाकी आहे.
पाच कोटी कर्जखात्यात वर्ग
टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील लाभार्थी शेतक-यांची यादी प्रथम प्रसिध्द झाली होती. या दोन गावातील ६९५ शेतक-यांच्या कर्ज खात्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४ कोटी ९७ लाख २२ हजार ४९६ रूपये वर्ग करण्यात आले आहेत.

Web Title: One lakh 5 thousand farmers in debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.