राजूरेश्वर संस्थानकडून एक लाखाची देणगी : दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:26+5:302021-01-16T04:35:26+5:30
राजूर : श्रीराम मंदिर जीर्णोध्दार बांधकाम निधी संकलनाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी राजूर येथे करण्यात ...
राजूर : श्रीराम मंदिर जीर्णोध्दार बांधकाम निधी संकलनाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुक्रवारी राजूर येथे करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री दानवे यांनी राजूरेश्वर संस्थानकडून एक लाखाच्या निधीची घोषणा केली.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांसह सर्वधर्मियांनी देणगी देऊन सहभाग नोंदवण्याचे आवाहन दानवे यांनी केले. प्रारंभी मान्यवरांनी राजुरेश्वराचा अभिषेक केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, मकरंद चांदोडकर, रूपेश राठी, संतोष आढवणे, सुधाकर दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दानवे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने देणगी देऊन जीर्णोध्दारात आपला सहभाग नोंदवावा. तसेच देणगी देताना पावती आवर्जुन घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी बाबुराव खरात, सुधाकर दानवे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, रामेश्वर सोनवणे, एकनाथ महाराज शिंदे, प्रा. बाळासाहेब बोराडे, विनोद डवले, भगवान नागवे, रतन ठोंबरे, प्रशांत दानवे, गणेश साबळे, श्रीरामपंच पुंगळे, ज्ञानेश्वर पुंगळे, मुसा सौदागर, पंढरीनाथ करपे, बबन मगरे, अर्जुन मांगडे, आप्पासाहेब पुंगळे, मोहिनीराज मापारी, विकास राठोड, मुकेश अग्रवाल, विष्णू राज्यकर, उमेश दारूवाले, विनोद पुंगळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
फोटो
राजूर येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, सुधाकर दानवे, बाबुराव खरात आदी उपस्थित होते.