मूर्ती गावात एकाचा खून: धारदार शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:06 AM2019-03-17T00:06:11+5:302019-03-17T00:06:35+5:30

घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील आसाराम बालकिशन सोळंके वय (५० वर्ष) यांचा मृतदेह गावाच्या दक्षिण भागात गट क्रमांक ११८ मध्ये साधारण २०० मीटर अंतरावर काटेरी झूडपात आढळून आला.

One of the murders in Murti village | मूर्ती गावात एकाचा खून: धारदार शस्त्र जप्त

मूर्ती गावात एकाचा खून: धारदार शस्त्र जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील मूर्ती येथील आसाराम बालकिशन सोळंके वय (५० वर्ष) यांचा मृतदेह गावाच्या दक्षिण भागात गट क्रमांक ११८ मध्ये साधारण २०० मीटर अंतरावर काटेरी झूडपात आढळून आला. खून सुमारे चार दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आसाराम यांच्या अंगावर वार केल्याचे व्रण असून, झालेला खून हा चार दिवसांपूर्वीच झाला असल्याचा अंदाज आहे. मृतदेह असलेल्या परिसरात दुर्गंधी येत होती, तर १३ मार्चला आसाराम सोळंके हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाच्या शेजारी दोन कोयते झूडपात आढळून आले. ते जप्त करण्यात आले.
घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी सुरेश देवडे यांनी त्याच ठिकाणी शवविच्छेदन केले. याप्रकरणी
आकस्मिक मृत्यूची नोंद घनसावंगी पोलिसांनी घेतली आहे. घटनास्थळी श्वानपथक व अगुली निर्देश विभागालाही पचारण करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, असे बंटेवाड म्हणाले.

Web Title: One of the murders in Murti village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.