जालन्याच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने कांदा, पत्ताकोबीचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:16 AM2018-11-01T11:16:16+5:302018-11-01T11:16:33+5:30

फळे,भाजीपाला : जालना कृषी  उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा, फुलकोबीचे दर चालू आठवड्यात घसरले आहेत़

Onion and flowers rates declined due to inward arrival in the Jalna market | जालन्याच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने कांदा, पत्ताकोबीचे दर घसरले

जालन्याच्या बाजारपेठेत आवक वाढल्याने कांदा, पत्ताकोबीचे दर घसरले

Next

जालना कृषी  उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा, फुलकोबीचे दर चालू आठवड्यात घसरले आहेत़ मागील आठवड्यात कांद्याचे दर २ हजार रुपये प्रतिक्विंटल होते़ या आठवड्यात सुमारे ७०० रुपयांनी कांदा घसरून तो १३०० रुपये प्रतिक्विंटल असा दर झाला आहे.

आवक वाढल्याने बाजारात पत्ताकोबीचेही दर कमालीचे घसरले़ १० रुपये प्रतिकिलो दर पत्ताकोबीचे भाव घाऊक बाजारात होते़ याशिवाय ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो भेंडीचे दर होते़ शिमला मिरची १५० ते २०० रुपये प्रति १० किलो असे दर बाजारात होते़ वांग्याचे दरही स्थिर आहेत़ प्रति १० किलोला ३०० ते ३५० रुपये भाव वांग्याला मिळाला़ दोडके प्रति १० किलोचे दरही वांग्याप्रमाणे ३०० ते ३५० पर्यंत आहेत़ १५० ते १८० प्रति शेकडा मेथीचे दर असून वाहतूक खर्चाचा भार लक्षात घेता सर्वसाधारणपणे घाऊक बाजारातील भाजी किरकोळ बाजारात ५ ते १० रुपयांनी वाढून विक्री होते़

Web Title: Onion and flowers rates declined due to inward arrival in the Jalna market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.