मुल सोडून शेतातून फक्त शेळ्याच घरी परतल्या; दुसऱ्या दिवशी दोघांचे आढळले मृतदेह

By दिपक ढोले  | Published: July 21, 2023 06:02 PM2023-07-21T18:02:08+5:302023-07-21T18:02:08+5:30

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

Only the goats returned home from the fields, leaving the children; The bodies of both were found the next day | मुल सोडून शेतातून फक्त शेळ्याच घरी परतल्या; दुसऱ्या दिवशी दोघांचे आढळले मृतदेह

मुल सोडून शेतातून फक्त शेळ्याच घरी परतल्या; दुसऱ्या दिवशी दोघांचे आढळले मृतदेह

googlenewsNext

राणी उंचेगाव: शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील तलावात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अभिजीत भारत येडे (१७), अर्चना संजय भालेराव (१५ दोघे रा. तळेगाव) अशी मयतांची नावे आहेत. 

अभिजीत येडे आणि अर्चना भालेराव हे दोघे गुरूवारी सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेले होते. परंतु, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेळ्याच घरी आल्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारपूस केली. रात्री आठ वाजेच्या सुमारास तळेगाव येथील तलावात अभिजीत येडे याच्या चपला तरंगतांना दिसल्या. शिवाय, त्याच ठिकाणी पाणी पिण्याची बॉटल दिसून आली. याची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली.

आज सकाळी नातेवाईकांनी गळ टाकून पाहिला असता, अभिजीत येडे याचा मृतदेह बाहेर आला. नंतर काहीवेळाने अर्चना भालेराव हिचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राणी उंचेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती बीट जमादार एम. बी. स्कॉट यांनी दिली.

गावावर पसरली शोककळा
अभिजीत येडे हा नुकताच दहावीत नापास झाला होता. त्यामुळे तो शाळेत जात नव्हता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अर्चना भालेराव ही सातवीत शिक्षण घेत होते. ते दोघेही शेळ्यासाठी चारण्यासाठी गेले होते. परंतु, त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळेगावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Only the goats returned home from the fields, leaving the children; The bodies of both were found the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.