११११ फुटांच्या तिरंग्याने सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:49 AM2019-09-17T00:49:10+5:302019-09-17T00:49:19+5:30
चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : विद्यार्थ्यांनी आपली राष्ट्रभक्ती - देशभक्ती सतत जागृती ठेवावी. या वयात झालेले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी राहतात. म्हणून या वयात चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केले.
कु. पिंपळगावात सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे व सरस्वती भूवन शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अंशीराम कंटुले यांच्या हस्ते या पदयात्रेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
ही पदयात्रा अंबड -पाथरी टी पॉईंट मार्ग मेन रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे देत देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले.
स्वागतगीत अपर्णा आर्दड, रोहिणी कंटुले आणि राजश्री भालशंकर यांनी गायले.
परिषदगीत किशोर मोरे यांनी घेतले. सूत्रसंचालन अंकिता कासट, प्रास्ताविक जिल्हा संयोजक विक्रम राऊत आणि आभार प्रा. नाना गोडबोले यांनी मानले. याप्रसंगी अभाविपचे आसाराम राऊत, प्रसिद्धी प्रमुख किशोर मोरे, पदयात्रा प्रमुख शरद चापाकानडे, आकाश चापाकानडे, मारोती कल्याणकर, आकाश मोरे, अशोक काळे, संजय नाईक, दीपक आर्दड, वेदांत खैरे, समाधान कुबेर, अनिकेत शेळके, रामदास बरसाले, दत्ता काळे, अविष्कार इंगळे, शर्मिष्ठा कुलकर्णी तसेच बजरंग दल, ग्रामविकास युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स. भू. प्रशाला, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल, व्यापारी महासंघ यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.