भीम फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:26 AM2019-01-21T00:26:06+5:302019-01-21T00:26:57+5:30

तीनदिवसीय भीम महोत्सवाचे रविवारी थाटात उदघाटन करण्यात आले.

The opening ceremony of the Bhim Festival | भीम फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

भीम फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पौष पौर्णिमेच्या साक्षीने जालन्यात भीम महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्राणिमात्राची हत्या करू नये, चोरी करणे पाप आहे, व्यभिचार करणे चूक आहे, मद्यपान करू नये या पंचशीलावर धम्म उभा आहे. या पंचशीलाची समाजाला नितांत आवश्यकता असून पंचशीलाचे अनुकरण केल्यास जीवनाला कलाटणी मिळेल, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय भीम महोत्सवाचे रविवारी थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद भिक्षु संघातर्फे बुद्धवंदना आणि अर्जुन खोतकर आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या प्रतिमेला मार्ल्यापण आणि दीपप्रज्वलन करून या भीम महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की, भारतातून सुरू झालेला बुद्धांचा धम्म आज जगभरात पोहचला आहे. बुद्धांचे विचार समाजात पोचविण्याचा आपण सर्वांनी संकल्प करावा. जालन्यातील हा भीम फेस्टीवल यावर्षीपुरता मर्यादित नसून यापुढेही दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येईल. जालन्यातील हा भीम फेस्टीवल राज्यभरात आदर्श ठरेल. आगामी काळात जालना भीम फेस्टिवलमध्ये दलाई लामा यांना आमंत्रित करून जालनेकरणा त्यांचे विचार ऐकण्याचा सुवर्णयोग घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार ही  खोतकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भीम फेस्टीवलच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलाकार जॉली मोरे आणि सीमा पाटील यांचा भीम बुद्धगीतांचा नजराणा पोवाडा आणि शाहिरी भीम गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी अ‍ॅड. बी. एम. साळवे, किशोर घोरपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, अ‍ॅड. भास्कर मगरे, गणेश रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, गुलाब पाचगे, प्रमोद रत्नपारखे, विष्णू पाचफुलें, अशोक साबळे, पांडुरंग डोंगरे, रमेश गव्हाड, मगन पवार, परमेश्वर गरबडे, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, अ‍ॅड. बबन मगरे, भाऊसाहेब घुगे, सुदाम सदाशिवे, संजय इंगळे, चेतन कांबळे, सगीर अहेमद, अरुण मगरे, योगेश रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.

Web Title: The opening ceremony of the Bhim Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.