मतदारराजा आज देणार महाकौल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:59 AM2019-04-23T00:59:36+5:302019-04-23T01:00:17+5:30
सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदान मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या ...
सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदान
मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत
असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर
कुणालाही मतदान करता येणार नाही.
जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.
काही गडबड झाली तर काय?
शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल.
संवेदनशील मतदारसंघ
जालना विधानसभा- संभाजी नगर, जैन इंग्लिश स्कूल, एसआरपीएफ रोड येथील एक, संजयनगर एक, औरंगाबाद रोडवरील एक, रेवगाव रोडवरील एक,
बदनापूर विधानसभा- एकफेल, इटा, खाडेगाव, गंगारामवाडी, भोकरदन विधानसभा-आव्हाना दोन, भुतखेडा दोन. सिल्लोड विधानसभा-सोयगाव, अंजिठा, घाटनादंरा, शिवाना, भाराडी, अंधारी, सिल्लोड तीन, फुलंब्री विधानसभा- आलंद, पल, लाडसावंगी, मुकुंदवाडी तीन, राजनगर, चिखलठाणा, करमाड, पैठण विधानसभा- एस.बी.विद्यालय बिडकीन, बिडकीन, खाडेदैठण, जि.प. शाळा पिंपळवाडी, पाचोड, श्रीनाथ बीएड कॉलेज पैठण, जि.प. शाळा विहामांडवा.
मंगळवारी होणाºया मतदानामुळे एकीकडे राजकीय वातावरण
तापले असताना उन्हाळ््याच्या चटक्यांमध्येदेखील वाढ झाली आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४१.२६ अंशांवर गेले होते. मंगळवारी तापमान ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.