बदल्यांचे आदेश धडकले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:11 AM2018-05-25T01:11:53+5:302018-05-25T01:11:53+5:30

होणार होणार म्हणून मागील वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील दोन हजार २७७ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर गुरुवारी धडकले.

 Order for transfer of teachers | बदल्यांचे आदेश धडकले...

बदल्यांचे आदेश धडकले...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : होणार होणार म्हणून मागील वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील दोन हजार २७७ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश अखेर गुरुवारी धडकले. बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाइन पद्धतीने थेट राबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण दिसून आले. बदलीपात्र शिक्षकांना तात्काळ पदभार देण्याचे आदेशात नमूद आहे.
शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. जिल्ह्यात मागील वर्षी शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शिक्षन विभागाने घेतला. त्यासाठी शिक्षकांना आॅनलाइन अर्जात पसंतीचे वीस गावे निवडण्याचे पर्याय देण्यात आले होते. आॅनलाइन अर्ज करून सहा महिने उलटले तरी बदल्यांचे आदेश निघाले नव्हते. त्यामुळे शिक्षकांमध्ये बदली प्रक्रियेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या महिन्याच्या सुुरुवातीला जिल्ह्यातील २६८ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश निघाले. त्यानंतर शिक्षकांना जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेशाची प्रतिक्षा होती. गुरुवारी जिल्ह्यातील दोन हजार २७७ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याची माहिती मिळताच शिक्षकांनी गटसाधन केंद्रात गर्दी केल्याचे दिसून आले. एकाच शाळेवर कार्यरत शिक्षकांनी एकमेकांना संपर्क करून कुठे बदली झाली याबाबत विचारपूस केली.
जिल्ह्यातील २१७ शिक्षक विस्थापित झाले आहेत. या वर्षी बदली प्रक्रिया प्रथमच आॅनलाइन पद्धतीने करण्यात आल्यामुळे यात कुणालाही हस्तक्षेप करता आला नाही. त्यामुळे शिक्षक बदल्यांसाठी केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाला आळा बसला. याबाबत अनेक शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. बदलीपात्र शिक्षकांना तात्काळ बदली झालेल्या शाळेवर जाऊन कार्यभार स्वीकारण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचे उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.

Web Title:  Order for transfer of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.