ध्येय निश्चिती अन् परिश्रमातून सामन्य खेळाडूही ऑलिम्पिक गाठू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:14+5:302021-09-13T04:28:14+5:30

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा जालना जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ...

Ordinary athletes can reach the Olympics through goal setting and hard work | ध्येय निश्चिती अन् परिश्रमातून सामन्य खेळाडूही ऑलिम्पिक गाठू शकतो

ध्येय निश्चिती अन् परिश्रमातून सामन्य खेळाडूही ऑलिम्पिक गाठू शकतो

Next

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, भाजपचे शहराध्यक्ष तथा जालना जिल्हा कब्बडी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राऊत, संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह क्रीडापटू अरविंद देशमुख, शेख चाँद पाशा, सुभाष देठे, तुळजेस भुरेवाल, सचिन आर्य, धनसिंग सूर्यवंशी, बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अभिजित देशमुख यांनी जालना टू जपान हा प्रवास सांगितला. तसेच ऑलिम्पिकसाठी कशी तयारी केली जाते हे सांगून खेळांडूचे कष्ट तसेच त्यांची जिद्द, खेळाविषयाची त्याांची निष्ठा याबद्दल त्यांनी एक तास मार्गदर्शन केले. जपानमध्ये कोरोना काळात तेथील सरकारने २० हजार खेळांडूची कशी बायोबबलमध्ये व्यवस्था केली हेही नमूद केले. त्यांनी ज्यावेळी मीराबई चानू तसेच सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचे अनुभव आणि त्यांचे पदक जिंकल्यावरच्या प्रतिक्रिया काय होत्या याबद्दल सांगितले. तसेच तुमची तयारी आणि परिश्रमांची तयारी असल्यास तुम्ही देखील देशासाठी पदक आणू शकता हा आशावादही देशमुख यांनी सांगितला. हॉकी तसेच तलवारबाजीतही भारताने केलेल्या उज्ज्वल कामगिरीचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला.

या कार्यक्रमास जालन्यातील ५० पेक्षा अधिक खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अंबेकर यांनी केले.

Web Title: Ordinary athletes can reach the Olympics through goal setting and hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.