अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी संघटन महत्त्वाचे : खेडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:25+5:302021-03-05T04:30:25+5:30
मुप्टा संघटनेच्या वतीने जिल्हाभर सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
मुप्टा संघटनेच्या वतीने जिल्हाभर सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. रंगनाथ खेडेकर, जिल्हाध्यक्ष उपप्राचार्य संभाजी तिडके यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. खेडेकर म्हणाले की, गवताच्या काडीला किंमत नसते, पण पेंढीला असते. तसेच अन्यायाचा प्रतिकार करतांना संघटन लागते, एकटा माणूस काही करू शकत नाही. आज शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यानंतर जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी तिडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी
मुख्याध्यापक वसंत सवने, पर्यवेक्षक अनिल सोनपावले, प्रा. संतोष रंजवे, सचिन खरात, अरूण वावरे, प्रशांत झरेकर, प्रा. आनंद नागरगोजे, सतीश बडे, प्रा. संतोष अंभुरे, प्रा. धनंजय जागृत, प्रा. मीनाक्षी कात्रे, प्रा. संजय सोनकांबळे, प्रा. शिवाजी आकात आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
040321\04jan_9_04032021_15.jpg
===Caption===
परतूर