आज लाईफ चेंजिंग सेमिनारचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:53 AM2018-06-03T00:53:15+5:302018-06-03T00:53:15+5:30
लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल. या सेमिनारमध्ये पुणे येथील गुरू फाऊंडेशनचे शिक्षणतज्ज्ञ दीपक जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.
हा सेमिनार विद्यार्थी व पालकांसाठी निशुल्क राहणार आहे. या सेमिनारमध्ये विद्यार्थांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यात मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त कसे करावे, केलेला अभ्यास जास्तीत -जास्त स्मरणात कसा राहिल याच्या टिप्स देण्यात येणार आहेत.
रविवारच्या सेमिनार नंतर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ ते ८ जून दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा भाग्यनगर येथील अभिजात ट्युटोरीलय येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेतून मुलांना अभ्यास मजेशीर वाटणे, अभ्यास लक्षात ठेवणे, कुठल्याही विषयात १०० टक्के रुची असणे, परीक्षेची भीती नाहीशी होणे, अगदी सहज लक्षात ठेवणे, स्मरणशक्तीमध्ये वाढ होवून परीक्षेतील चुका कशा टाळाव्यात, कल्पना शक्ती वाढविण्याच्या टिप्स, गणितीय सूत्र लक्षात ठेवणे यासह अनेक गोष्टी या कार्यशाळेतुन शिकता येणार आहेत. रविवारी होणाºया सेमिनारला जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कार्यशाळेसाठी कॅम्पस क्लब सदस्यांना प्रवेश मोफत असून सदस्यांना ओळखपत्र आवश्यक आहे. नाव नोंदणीकरिता ९९७०२३९१०३, ९७३००२००६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.