शिक्षकांसाठी मराठवाडास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:34 AM2018-12-17T00:34:26+5:302018-12-17T00:34:45+5:30

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस (ता.मंठा) शाखेच्या वतीने शिक्षकांसाठी मराठवाडा पातळीवर कथाकथन स्पर्धचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे

Organizing the Marathwada Level Storytelling Competition for Teachers | शिक्षकांसाठी मराठवाडास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन

शिक्षकांसाठी मराठवाडास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस (ता.मंठा) शाखेच्या वतीने शिक्षकांसाठी मराठवाडा पातळीवर कथाकथन स्पर्धचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे,अशी माहिती अध्यक्षा कल्पना हेलसकर यांनी दिली आहे.
मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर कथाकथन स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाची विभागीय स्पर्धेत निवड करण्यात येईल.विभागीय स्पर्धा मंगळवार ८ जानेवारी २०१९ रोजी सेलू (जि.परभणी) येथे होईल. .जिल्हास्तरीय स्पर्धा सुरेखा प्राथमिक शाळा, जालना, परभणी : जि.प कन्या प्रशाला, परभणी, नांदेड : गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल शिवमळा पूर्णा रोड, नांदेड, लातूर : संत ज्ञानेश्वर विद्यालय, अहमदपूर, बीड : श्री.संत भगवानबाबा निवासी आश्रमशाळा वाघाळा ता. परळी,हिंगोली : महात्मा गांधी विद्यालय, वसमत, उस्मानाबाद : सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी ता. पोहनेर जि. उस्मानाबाद, औरंगाबाद : ज्ञानेश विद्यालय,एसटी कॉलनी, औरंगाबाद असे आहेत. या कथाकन स्पर्धेत प्रथम येणाºया कथेस दीड हजार रुपये ,द्वितीय एक हजार तर तृतीय तृतीय क्रमांक ५०० रुपये रोख रक्कम, स्मतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व श्यामची आई ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. शिक्षकांना मराठी भाषेतूनच कथा सादर करावी लागेल. कथा सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आलेला असून परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे.
मराठवाठ्यातील शिक्षकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुहास सदावर्ते, कार्याध्यक्ष जमीर शेख, बाबासाहेब हेलसकर, योगेश ढवारे, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे यांनी केले आहे. दरम्यान, साने गुरुजी कथामाला समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याही उपक्रमास असाच उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला.

Web Title: Organizing the Marathwada Level Storytelling Competition for Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.