जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:00 AM2019-04-26T01:00:24+5:302019-04-26T01:00:41+5:30

भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली.

 Organizing a mass marriage ceremony in Jalna | जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

जालन्यात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील भाईश्री फाऊंडेशनच्या वतीने २००१ पासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा विवाह सोहळा सात मे रोजी पार पडणार असल्याची माहिती उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल यांनी दिली. या अंतर्गत गुरूवारी या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांच्या नातेवाईकांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले.
यंदाचा हा सोहळा दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द भागवतकार शेष महाराज गोंदीकर, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांची उपस्थिती राहणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये गुजरातमधून या सामूहिक सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. पाचवर्ष हा सोहळा गुजरातमध्ये करण्यात आला. तर २००५ पाासून हा सोहळा जालन्यात सुरू करण्यात आल्याचे रमेश पटेल म्हणाले. यासाठी आमच्या उद्योगासह जालन्यातील अन्य दानशूर व्यक्तींकडून यासाठी मदत होत असल्याचेही पटेल यांनी आवर्जून सांगितले.
हा आपला वारसा मुलगा भावेश पटेल तसेच त्यांचा मित्र परिवार तेवढ्याच उत्साहाने पुढे नेत असल्याचे समाधान आपल्याला होत आहे. गुरूवारी भाईश्री चेंबरच्या कार्यालयात दुपारी वधू-वरांच्या जोडप्यास संसारोपयोगी वस्तूंच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी भावेश पटेल, रितेश मंत्री यांचीही उपस्थिती होती.
५०० जोडप्यांचे संसार गुण्यागोविंदाने
आम्ही हाती घेतलेल्या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यात आतापर्यंत ज्या जोडप्यांचे विवाह झाले, त्यांचे संसार आज सर्वत्र गुण्या गोविंदाने सुरू आहेत, हे त्यांच्याच्या तोंडून ऐकून मोठे समाधान होते. या उपक्रमातून जे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, त्यांना जी मदत मिळते ती देखील इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.
- रमेश पटेल, संयोजन समितीचे अध्यक्ष

Web Title:  Organizing a mass marriage ceremony in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.