उजळून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:33 AM2018-01-28T00:33:30+5:302018-01-28T00:33:33+5:30

सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी राजूर येथे घडली.

Ornaments stolen by cheat | उजळून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास

उजळून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास

googlenewsNext

राजूर : सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी ३५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी राजूर येथे घडली.
राजूर येथील शंकर रामभाऊ गुळवे यांचे टेंभूर्णी रस्त्यावर घर आहे. दुपारी त्यांची पत्नी कविता घरी असताना दोन भामटे मोटारसायकलवर आले. त्यांनी कविता यांना तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने उजळून देतो, असे सांगितले. कविता यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कानातील सोन्याची फुले, गळ्यातील पोत, असे ३५ हजारांचे दागिने काढून दिले. भामट्यांनी सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवले आणि दुसरा डबा कविता यांच्या हातात दिला. डबा गॅसवर दहा मिनिटे गरम करा, त्यानंतर सोन्याचे दागिने बाहेर काढा, असे सांगितले. दोघे दुचाकीवर निघून गेले. संशय आल्यानंतर कविता यांनी डबा उघडून पाहिला. मात्र, तो रिकामा आढळून आल्याने फसवणूक झाल्याचे कविता यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत दोघे भामटे पसार झाले. कुटुंबियांनी शोध घेऊन ते सापडले नाहीत. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्र्रकरणी शंकर गुळवे यांनी राजूर पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: Ornaments stolen by cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.