आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:42 PM2024-09-25T12:42:55+5:302024-09-25T12:43:53+5:30

पोलिस असताना चार तरुण आमच्या आंदोलन स्थळी आले, त्यांचा काय उद्देश होता हे पोलीस अधीक्षक यांनी तपासण्याची लक्ष्मण हाके यांची मागणी

Our lives are in danger, Laxman Hake claims that 4 youths tried to attack in the middle of the night | आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा

आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : ''
जरांगे पाटलाचे चेले वाळूचा धंदा करतात. जरांगेंचा एक समर्थक आहे काळकुटे. तो इथे येऊन आम्हाला धमकी देत आहे. दोन नंबरचे धंदे करणे हाच जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांचा व्यवसाय आहे'', असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. तसेच आमच्या जीवाला धोका आहे, मध्यरात्री चार तरुण आंदोलनस्थळी हल्ल्याच्या उद्देशाने आले होते, असा दावा करत हाके यांनी त्यांचा काय उद्देश होता हे पोलीस अधीक्षक यांनी तपासावे, अशी मागणी केली. 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राजेश टोपे यांच्यावर जोरदार टीका केली. पुढे बोलताना हाके म्हणले, राजेश टोपे हे शरद पवारांचे चेले आहेत टोपे हे सेक्युलरवादी असल्यामुळे ते जरांगे यांना भेटले असल्याचा टोला, हाके यांनी लगावला. तर पृथ्वीराज चव्हाण तुम्ही महाराष्ट्राचे एकदा भ्रमण करा. तुम्ही अनेक प्रतिष्ठित पदे भोगले. मात्र महाराष्ट्रात अनेक ओबीसी लोक आहेत ते कधी तुम्हाला दिसले का? असा सवाल करत राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातून काढून टाकावे अन्यथा पक्षाचे नुकसान होईल, असा टोला हाके यांनी लगावला.

आजूबाजूला पोलीस सुरक्षा असताना काही तरुण हल्ल्याचा उद्देशाने आमच्याकडे येतात कसे काय? त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. आमच्या अंगावर आला तर आम्ही शिंगावर घेणार, असा इशारा हाके यांनी दिला. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आता आम्ही राजा म्हणणार नाही. त्यांनी कितीही शिव्या दिल्या जीव घेतल्या गोळ्या घातल्या तरी आम्ही आता त्यांना राजा म्हणणार नाही, अशी भूमिका हाके यांनी व्यक्त केली.

नवनाथ वाघमारे यांची राजेश टोपेंवर टीका 
जरांगे यांचे आंदोलन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी सुरू केले आहे. राजेश टोपे हे शरद पवार साहेबांचे शिष्य आहेत. ओबीसी समाजाला दाबण्यासाठी हा सर्व खटाटप सुरू आहे. राजेश टोपे हे रसद पुरवायला गेले होते. ओबीसी समाजाने आता जागा झाला पाहिजे. मध्यरात्री एकच्या सुमारास काही तरुण आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. तो हल्ला मी परतून लावला.आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाच प्रसाद देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

जरांगे नौटंकीबाज माणूस
वडीगोद्रीत पोलिसांवर दबाव सुरू आहे. मुख्यमंत्री आणि शंभुराज देसाई हे दबाव टाकत आहेत. जरांगे उपोषण करत नाही, तर ते निव्वळ नौटंकीबाज माणूस आहेत. समाजाला भावनिक करायचं. आठ दिवसात आठ सलाईन घेतले आहे. जरांगे नाटक कंपनी आहे. तमाशात बताशा म्हणून ते कामाला पाहिजेत, अशी बोचरी टीका वाघमारे यांनी जरांगे यांच्यावर केली.

Web Title: Our lives are in danger, Laxman Hake claims that 4 youths tried to attack in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.