पान १चा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:46+5:302020-12-30T04:40:46+5:30
रेखा निकाळजे यांना होळकर समता पुरस्कार जालना : उपेक्षित, वंचित घटक, अन्यायग्रस्त महिला यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या येथील ...
रेखा निकाळजे यांना होळकर समता पुरस्कार
जालना : उपेक्षित, वंचित घटक, अन्यायग्रस्त महिला यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा बाबासाहेब निकाळजे यांना नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रेखा निकाळजे यांनी शहर व ग्रामीण भागात महिला बचत गट स्थापन करून विविध प्रकारे अन्यायग्रस्त असलेल्या महिलांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेखा निकाळजे यांना सदर पुरस्कार पाठविण्यात आला आहे. शाल, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काबद्दल सुमित्रा जोशी, अलका झाल्टे, कल्पना मिसाळ, महेश तौर, अशोक काळे, योगेश मोहिते आदींनी कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
जालना : जालना नगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या १३ सप्टेंबर २०१३ च्या आदेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना अधिकृत परवाना देण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडे केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, अजित कोठारी, फिरोज बागवान, रंगनाथ वाघमारे, संजय कुलथे, जावेद बागवान रफीक बागवान, शाकेर बागवान, इरफान बागवान, राजेश वाडेकर, ज्ञानेश्वर अम्बातपुरे, ओंकार सोनावणे, किशन उदावंत, मुजीब बागवान आदींची उपस्थिती होती.
फोटो
दिंडी महामार्गावरील नालीला भगदाड
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी बसस्थानक भागातील दिंडी महामार्गाचे अनेक कामे सुरू आहेत. संबंधित कंपनीने स्थानिक गुत्तेदारांना कामे दिल्यामुळे कामाचा दर्जा घसरल्याचा तक्रारी आहेत. मात्र, याकडे एमएसआरडीसी व कंपनीकडून कायम दुर्लक्ष केले जात होते. यातच तळणी गावात जाणाऱ्या नालीला भगदाड पडल्याने कामांच्या दर्जाची पोलखोल झाली. दिंडी महामार्गावरील तळणी बसस्थानक भागातील सर्वच कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.