पान एक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:20 AM2021-01-01T04:20:56+5:302021-01-01T04:20:56+5:30
शहागड : येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथील मंदिरात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू असून, भविकांची मोठी गर्दी आहे. ...
शहागड : येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथील मंदिरात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू असून, भविकांची मोठी गर्दी आहे. या गर्दीत संशयास्पदरीत्या फिरत असणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून २० ग्रॅमचे दोन मंगळसूत्र जप्त केले. अजय बाबासाहेब शिंदे, अशोक बाबासाहेब शिंदे (वय २५, रा. गोंदी तांडा ता. अंबड) असे संशयित आरोपीची नावे आहेत.
प्रवाशाची विसरलेली बॅग रिक्षाचालकाने केली परत
जालना : प्रवास करत असताना रिक्षात विसरलेली बॅग रिक्षाचालकाने सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अफरोज हमीद खान, असे या रिक्षा चालकाचे नाव आहेत. रिक्षाचालकाने दाखवलेल्या या इमानदारीबद्दल पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी अफरोज यांचा पुष्पगुच्छ देऊन बुधवारी सायंकाळच्या सुमारास गौरव केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जालना : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाजपचे जालन्यात आंदोलन
जालना : औरंगाबादमध्ये तरूणीवर कारमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहरातील संभाजी उद्यानाच्या समोर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी चंद्रशेखर बावनकुळे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, युवा जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस, रमेश भापकर, संपत टकले, गजानन उफाड, विकास पालवे, नितीन सरकटे, दौलत शहाणे, विक्रम उफाड, योगेश ढोणे, शत्रू कणसे, अविनाश राठोड, मनोज दांडगे, सचिन नारीयलवाले, विनोद दळवी, अश्विनी आंधळे यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
तेली समाजाची बैठक
जालना : संत संताजी तेली समाज ट्रस्टची महत्वाची बैठक बुधवारी सकाळी औरंगाबाद रोडवरील हॉटेल अथवमध्ये पार पडली. तली समाज ट्रस्टचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोषाध्यक्ष जगनाथ पिंपळे, जगनाथ सिनगारे यांची उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या समाज बांधवांंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत संत संताजीतेली समाज ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदी कैलास सोनवणे यांची निवड करण्यात आली.