पान एकचा पट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:48+5:302020-12-30T04:40:48+5:30
जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना ...
जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यास यंदा निर्बंधाचे बंध ठेवण्यात आले आहे. यामुळे नेहमीसारखा जल्लोष पाहयला मिळणार नाही. कोरोना परिस्थितीनंतर शासनाने अनेक बाबतीत निर्बंध ठेवले आहेत. यातच हॉटेल आणि ढाबा यांना वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळेच नवीन वर्षाचे स्वागताला उत्तर रात्रीच्या मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहेत.
स्मशानभूमीसाठी आरक्षण
जालना : शहराचा वाढलेला विस्तार आणि चोहोबाजूने वाढलेले शहरीकरण पाहता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह नगर पालिकेने शहराच्या चारही बाजूने नवीन व अद्ययावत स्मशानभूमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी डीपीमध्ये दोन ठिकाणी स्मशानभूमीसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. तर दोन ठिकाणी जागांचा शोध घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून स्मशानभूमीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.
मुख्य जलवाहिनी फुटली ; पाणी वाया
भोकरदन : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत. या गळतीमुळे बसस्थानक परिसरात रस्त्यावरच पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भोकरदन शहरासाठी दानापूर येथील जुई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या योजनेच्या पाईलाईनची व्यवस्थित देखभाल केली जात नाही.
संगणकीय प्रणाली योजनेला मुदतवाढ
वडीगोद्री : कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योनजा या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शासनाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहेत. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबीकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
साष्टपिंपळगावात आरक्षणासाठी आंदोलन
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून, आरक्षणाअभावी सुशिक्षित तरूणांमध्ये नैराश्य पसरले आहे. केंद्र सरकारने एक विचाराने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. या निवेदनावर संजय कटारे, ज्ञानेश्वर बोचरे, उमेश औटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.