पान तीन लहान बातम्या २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:15+5:302020-12-24T04:27:15+5:30
जालना : शंभर शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या वतीने रविवारी सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा घेण्यात ...
जालना : शंभर शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या वतीने रविवारी सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षक मित्र वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ९५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रा. डाॅ. राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षेखाली स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्य सुधीर देसाई, प्रा. हेमंत खडगे, प्रा. एम. जी. जोशी, नंदकुमार काळे, सुरेश हिवाळे, माया कवानकर, छाया गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सवानी यांचा सत्कार
जालना : एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव निखील सवानी हे जालना शहरात आले होते. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमूद, कल्याण दळे, विजय कामड, राजेंद्र राख, गणेश राऊत, गुरूमितसिंग, आनंद लोखंडे, चंद्रकांत रत्नपारखे यांच्यासह काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज भरण्याचे आवाहन
घनसावंगी : कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे होणारी प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्नित करून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावा, असे आवाहन घनसावंगीचे तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी केले आहे.
गोंदी ठाण्याचे प्रभारी बल्लाळ यांचा सत्कार
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी पदभार हाती घेतला आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने बल्लाळ यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे हद्दीतील चोऱ्या रोखण्यासाठी गस्त वाढविणे, गरजेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सरपंच, पोलीस पाटील यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली जाणार असल्याचे यावेळी बल्लाळ म्हणाले.