पान दोनचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:32+5:302020-12-24T04:27:32+5:30

परतूर : येथील परमेश्वर ढवळे यांची सावता परिषदेच्या परतूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ही ...

Page two strap | पान दोनचा पट्टा

पान दोनचा पट्टा

Next

परतूर : येथील परमेश्वर ढवळे यांची सावता परिषदेच्या परतूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ही निवड केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू काळे, भास्कर गाढवे आदींची उपस्थिती होती. या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

आष्टीत बचत गटास कजार्चे वाटप

आष्टी : येथील आदर्श अर्बन को - आॅप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने जय भवानी महिला बचत गट या संस्थेला एक लाख रुपए रकमेचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. धनादेश वाटप करताना पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात, ज्ञानेश्वर काळे, अर्जुन थोरात, नाथाभाऊ खुळे, अविनाश राठोड, एकनाथ राहवे, रमेश चव्हाण, कैलास राठोड, बाबासाहेब चौरे आदी उपस्थित होते.

भोकरदन येथे खंडोबा महाराजांची यात्रा

भोकरदन : प्रथा परंपरेप्रमाणे भोकरदन शहराचे ग्रामदैवत श्री खंडोबाची चंपाषष्ठीला सकाळी महापूजा व महाआरती कोरोनाचे नियम पालन करून करण्यात आली. तळी उचलल्यानंतर सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात भलामोठा साखळदंड बांधण्यात आला. उपस्थित भक्तांच्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. तसा एका झटक्यात साखळदंड तोडण्यात आला. यावेळी भक्तांची उपस्थिती होती.

उत्पन्नाचे हमीपत्र रद्द करण्याची मागणी

जालना : शिधापत्रिकाधारकांना सादर करावे लागणारे उत्पन्नाचे हमीपत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात यावे, अशी मागणी महामाया सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष प्रेम जाध‌व, संतोष गाढे, शेख सलाम, शेख आरेफ, शेख अमजद, आकाश लोंढे, कैसर सय्यद, मुजाहेद बागवान, जोसेपा आदींनी दिला आहे.

जाफराबादकर विद्यालयात कार्यक्रम

जाफराबाद : येथील कै. बाबूराव जाफराबादकर विद्यालयात सोशल डिस्टन्स ठेऊन गणित दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मिनाक्षी कुलकर्णी, गणित शिक्षक भीमाशंकर जवळेकर यांच्या श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्त गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध गणित प्रयोगांची मांडणी केली. सूत्रसंचालन संदीप इंगोले यांनी तर मदन सोजे यांनी आभार मानले.

दत्त जयंतीनिमित्त मुद्रेगाव येथे कीर्तन महोत्सव

जालना : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे २३ ते ३० डिसेंबर दरम्यान दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या सप्ताहात कीर्तन महोत्सव तसेच भावार्थ रामायण कथा, गुरूचरित्र पारायण आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रेगाव येथील दत्त संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Page two strap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.