पहाडे महाविद्यालयास विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:51 AM2019-01-18T00:51:26+5:302019-01-18T00:52:44+5:30
कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयात रावसाहेब पाटील टोपे स्मृतीनिमित्त विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयात रावसाहेब पाटील टोपे स्मृतीनिमित्त विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद येथील माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयास सांघिक विजेतेपद मिळाले आहे.
या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा मध्यवती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. आर. के. भुतेकर, डॉ. संभाजी पाटील, अनिरुध्द मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेत प्रसार माध्यमे समाजभान निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहेत काय, याविषयावर ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा पार पडली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडून सोशल मीडिया आणि प्रचलित माध्यमावर सविस्तर विचार व्यक्त केले.
स्पर्धेत माणिकचंद पडाडे विधि महाविद्यालयातील कल्याणी काकडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल तिला ५ हजार शंभर रुपये बक्षीस आणि प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील विद्या अंभोरे हिने मिळविला असून, तिला रोख चार हजार शंभर रुपये आणि प्रमाणपत्र तर विजय वाकडे आणि अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचा लक्ष्मण गोडसे यांने तृतीय क्रमांक मिळविला असून, ३ हजार शंभर रुपये परितोषिक देण्यात आले.
यावेळी परीक्षक म्हणून बाबासाहेब डोंगरे, आकाश गायकवाड यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. माधव ढेरे, डॉ. व्ही. टी. काळे, डॉ. प्राध्यापक दादासाहेब गजहंस, आर. के. काळे, अतिश तिडके, संदीप खरात, कृष्णा बनसोडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.