ब्राह्मण समाजाचे पळी-ताम्हण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:31+5:302021-01-23T04:31:31+5:30
परतूर : शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर पळी-ताम्हण आंदोलन करण्यात ...
परतूर : शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर पळी-ताम्हण आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदनही वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आले.
ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे, तरुण व व्यावसायिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटींची तरतूद करावी, जिल्हास्थानी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे, ब्राह्मण समाजाविषयी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर शिक्षा करणारा कायदा करावा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, पुरोहित्य करणाऱ्यास ५ हजार रुपये/मानधन सुरू करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर ॲड.भगवानराव कवडी, ॲड.डोल्हारकर, ॲड.ए. आर. देशपांडे, मुरलीधर देशमुख, राजेश खंडेलवाल, विजय राखे, लक्ष्मीकांत कवडी, अरुणाताई चामणीकर, प्रदीप राखे, नंदकिशोर कुलकर्णी, श्यामसुंदर चितोडा, समीर राखे, शाम जवळेकर, योगेश खंडेलवाल, सिद्धार्थ कुलकर्णी, प्रसाद बाप्ते, केदार शर्मा, योगेश रोहीनकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.