वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ : सलग दुसऱ्या वर्षी अडीच लाखांचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:00+5:302021-07-19T04:20:00+5:30
कोरोनामुळे एकही पालखी जाणार नाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून ...
कोरोनामुळे एकही पालखी जाणार नाही
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकऱ्यांना पंढरपुरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून एसटीने एकही पालखी जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातून दरवर्षी जातात ६० ते ७० पालख्या
आषाढी यात्रेनिमित्त दरवर्षी जालना जिल्ह्यातून हजारो वारकरी पंढरपूरला जातात. जिल्ह्यातून जवळपास ६० ते ७० पालख्या जातात; परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने वारीला जात येत नाही. यंदाही शासनाने निर्बंध लादल्याने वारकरी नाराज झाले आहेत.
अनेक वर्षांपासून मी पंढरपूरच्या वारीला जातो; परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरपूरला जाता येत नाही. यंदा जाण्याची अपेक्षा होती; परंतु पुन्हा शासनाने निर्बंध लादले आहेत. गावाकडे मन रमत नाही.
प्रल्हाद भुतेकर, वारकरी
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वारी बंद आहे. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे; परंतु तरी शासनाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे गावाकडे मन रमत नाही.
राम सोळुंके, वारकरी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरची वारी बंद आहे. वारीसाठी दरवर्षी १२० बस धावतात. त्यातून महामंडळाला जवळपास अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यंदा ते मिळणार नाही.
प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, जालना