निधी संकलनासाठी शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:28 AM2021-01-21T04:28:38+5:302021-01-21T04:28:38+5:30
हे निधी संकलन अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असे एक महिना चालणार आहे. तीर्थपुरी येथील शोभायात्रेत प्रभू श्रीरामांची ...
हे निधी संकलन अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असे एक महिना चालणार आहे. तीर्थपुरी येथील शोभायात्रेत प्रभू श्रीरामांची आठ फुटांची मूर्ती ठेवण्यात आली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात गावातून ही शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या सुरुवातीलाच गावातील ज्येष्ठ कापड व्यापारी द्वारकादास अग्रवाल व भागीरथ अग्रवाल यांनी सहकुटुंब येऊन एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी दिली. यात्रेदरम्यान महिलांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन व घरासमोर सडारांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले. दुर्गामाता मंदिरातून शोभायात्रेची सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून पुन्हा दुर्गामाता मंदिरात समारोप करण्यात आला. यावेळी शिवाजी बोबडे, श्रीकृष्ण बोबडे, चंद्रकांत पवार, अंकुश बोबडे, रमेश बोबडे, राजेंद्र चिमणे, अशोक खेत्रे, अजय जोशी, रघुनाथ मोटे, भगीरथ अग्रवाल, परमेश्वर तोष्णीवाल, योगेश अग्रवाल, कृष्णा गाढेकर, प्रकाश शहाणे, रामेश्वर बोबडे, कृष्णा अग्रवाल, नवनाथ वाजे, नवनाथ बोबडे यांच्यासह भजनीमंडळी व रामभक्त उपस्थित होते.