जय परशुरामच्या जयघोषाने शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:52 AM2018-04-19T00:52:08+5:302018-04-19T00:52:08+5:30
बुधवारी अक्षयतृतीयेनिमित्त परशुराम जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी जुन्या जालन्यातील बालाजी मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जय परशुराम.. च्या जयघोषाने बुधवारी अक्षयतृतीयेनिमित्त परशुराम जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी जुन्या जालन्यातील बालाजी मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाना महाराज पोखरीकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ.अरविंद चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, अॅड. सुनील किनगावकर, विलास नाईक, अॅड. बी.व्ही. नाईक, विनायक महाराज फुलंब्रीकर, सुधाकर लोखंडे, सुरेश मुळे, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, आर.आर.जोशी, सिध्दीविनायक मुळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र देशपांडे व समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.
यावेळी अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, राजेश राऊत, विलास नाईक आदींनी मार्गदर्शन केले. ब्राह्मण समाजाने नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केल्याचे खोतकर म्हणाले. बालाजी मंदिरापसून निघालेल्या मिरवणुकीत समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती. महिलांचा सहभागही लक्षणीय ठरला.
गांधी चमन येथून मिरवणूक
गांधी चमन येथूनही परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही यावेळी सर्वपक्षीय परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वैद्य, आदित्य देशपांडे यांच्यासह अन्य युवकांचा मोठा सहभाग होता. दरम्यान सकाळी बडी सडकवरील राम मंदिरात श्रीरामाची महाआरती करण्यात आली. यावेळी पंडित मनोज महाराज गौड व अन्य भाविकांची मोठी उपस्थिती होती.