निम्न दुधनाचे पाणी झेपावले परभणीकडे; प्रकल्पातून पाणी सोडण्याची दुसरी वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:36 AM2018-02-07T00:36:28+5:302018-02-07T12:28:57+5:30

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी परभणी शहराची तहान भागवण्यासाठी मंगळवारी झेपावले असून, धरणाच्या चार दरवाजातून एक हजार १८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही दुसरी ही वेळ आहे.

Parbhani has given lower dudhna's water | निम्न दुधनाचे पाणी झेपावले परभणीकडे; प्रकल्पातून पाणी सोडण्याची दुसरी वेळ

निम्न दुधनाचे पाणी झेपावले परभणीकडे; प्रकल्पातून पाणी सोडण्याची दुसरी वेळ

googlenewsNext

परतूर: निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी परभणी शहराची तहान भागवण्यासाठी मंगळवारी झेपावले असून, धरणाच्या चार दरवाजातून एक हजार १८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. प्रकल्पातून पाणी सोडण्याची ही दुसरी ही वेळ आहे.
परभणी व पूर्णा शहराला यावर्षी हिवाळ्यातच पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. दोन महिन्यांपासून या शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने या शहराची तहान भागवण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. दाने महिन्यांपूर्वी पूर्णापर्यंत धरणातील पाणी सोडण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रकल्पाचे सात, १६, १३ आणि २० क्रमांकाचे दरवाजे परभणीच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून एक हजार १८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. चारही दरवाजातून ४८ ते ५० तास पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. धरणात सध्या एकूण पाणी साठा ७२ टक्के आहे. यावर्षी या धरणावर परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या मोठ्या शहरांसह आजूबाजूची गावे, तसेच सिंचनासाठी अवलंबून राहावे लागणार आहे. .त्यामुळे या धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
-----------
पाणी झेपावताच पात्र भरले
या धरणाचे चार दरवाजे उघडताच धरणाखालील कोरडे पडलेले नदीचे पात्र क्षणार्धात पाण्याने खळखळून वाहू लागले. यामुळे पात्रात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होेते.

Web Title: Parbhani has given lower dudhna's water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.