नागपूरमधील जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:58 PM2017-12-07T23:58:20+5:302017-12-07T23:58:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सत्तेत ...

Participate in the People's Rally in Nagpur | नागपूरमधील जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा

नागपूरमधील जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा

googlenewsNext
ठळक मुद्देसुरेशकुमार जेथलिया : हिवाळी अधिवेशनावर काँग्रेसचा मोर्चा, सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सत्तेत येऊन साडेतीन वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारविरूद्ध १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी गुरुवारी येथे केले.
मोर्चाच्या पूर्वतयारी संदर्भात गुरुवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष विलासराव औताडे, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, अनुसूचित जातीजमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय जºहाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आ. जेथलिया म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने सत्ता प्राप्तीनंतर खोटी आश्वासने देण्याशिवाय काहीच केले नाही. फसवी कर्जमाफी, शेतमालाचे पडलेले भाव, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आदी प्रश्नांवरून शेतकºयांसह सामान्य जनतेत सरकारविरूद्ध मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण आणि अन्य मान्यवरांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने आपसातील मतभेद आणि गटबाजी बाजुला ठेवून मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
सरकारप्रती जनतेत असलेला आक्रोश आता भाजपापर्यंत पोहोचल्याने भाजपाचे नेते यशवंत सिन्हा आणि खा. नाना पटोले सारखी मंडळी शेतकºयांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करू लागली आहे. या सरकारचे दिवस भरत आल्याचे संकेत मिळू लागले असल्याचे औताडे म्हणाले. भीमराव डोंगरे, विमलताई आगलावे, विजय कामड, सत्संग मुंढे आदींनीही यावेळी सरकारच्या कारभारावर टीका केली. प्रास्ताविक शहराध्यक्ष अब्दुल हाफीज यांनी केले. खा. राजीव सातव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख, शेख खलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधाचा ठराव बैठकीत मांडला. या ठरावाला मुंढे यांनी अनुमोदन दिले. आभार प्रदर्शन सरचिटणीस राजेश काळे यांनी केले. बैठकीस एकबाल कुरेशी, सभापती दत्तात्रय बनसोडे, कृष्णा पडूळ, संतोष माधोवाले, प्रकाश नारायणकर, निळकंठ वायाळ, विठ्ठलसिंग राजपूत, शरद देशमुख, मोहन इंगळे, सय्यद मुसा, अ‍ॅड. विनायक चिटणीस, रऊफ परसूवाले, परमेश्वर गोते, ज्ञानेश्वर उगले, सुभाष ढाकणे, इब्राहिम कायमखानी, बाबा गाडगे, विष्णू चव्हाण, विष्णू कंटुले, देशमुख, मनोज जाधव, युवराज राठोड, लक्ष्मण शिंदे, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Participate in the People's Rally in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.