चार हजार कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:48 AM2018-08-08T00:48:33+5:302018-08-08T00:49:09+5:30

सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला मंगळवारी जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला.

Participation of four thousand employees in strike | चार हजार कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

चार हजार कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला मंगळवारी जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांनी काम बंद ठेवून निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकीकडे पीककर्ज मिळण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र हे महसूल विभागाशी निगडीत असल्याने ते मंगळवारी मिळाले नसल्याने अनेक शेतकºयांना बँकेतूनही परत जावे लागले. या संदर्भात राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.बी. मते आणि सहसचिव वाय.एस.पठाण यांनी सांगितले की, या संपात जवळपास चार हजारांपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. हा संप आणखी दोन दिवस चालणार आहे.
दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ राजपत्रित अधिका-यांची उपस्थिती होती. मात्र संप असल्याने नेहमी गजबलेला असणारा जिल्हाधिकारी परिसरात शुकशुकाट दिसून आला.

Web Title: Participation of four thousand employees in strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.