परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:03 AM2018-02-26T01:03:22+5:302018-02-26T01:05:07+5:30

शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

Partur-Ashti road becomes the trap of death | परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
दिवसेदिवस या मार्गावर वाहनांची सख्या वाढत आहे. मात्र रस्त्याचे रूंदीकरण अद्यापही करण्यात आले नाही. त्यातच वाहनधारकही आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने वाहनाला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी अनेक वेळा या मार्गावर अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. वाढती वाहनांची गर्दी बघता या मार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिक , वाहनधारकांनी केली आहे.
मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. एकेरी रस्ता त्यातचही मोठी खड्डे यामुळे वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या मार्गावर साखर कारखाना असल्याने या मार्गावरून नियमित जड वाहनांची गर्दी असते.
खड्डा चुकविण्याच्या नादात अनेकवेळा उसाची ट्रॉली उलटून अपघात होत आहे. तसेच वाळूने भरलेलेल हायवा ट्रक सुध्दा ये जा करीत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे.
मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिक्षेचे दिवस असल्याने या मार्गावरून विद्यार्थ्यांची ये जा वाढली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची गैरसोय बघता या मार्गाची पक्के डांबरीकरण करण्याची मागण नागरिकांतून होत आहे.
याचा मार्गावर आष्टी रेल्वे गेट आहे. या गेटवरील उड्डाण पुलाचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. यामुळे या गेटवर दर दहा मिनिटाला वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे हा मार्ग अडथळयाबरोबरच धोकादायकही बनला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम सुरू करून वाहतूक कोेंडी सोडविण्याची गरज आहे.

Web Title: Partur-Ashti road becomes the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.