रुग्णसेवा हे जीवनदायी कार्य - पुरुषोत्तम जयपुरिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:29 AM2021-05-14T04:29:36+5:302021-05-14T04:29:36+5:30

जालना : वैयक्तिक भावना बाजूला ठेवून, लोकहिताची जबरदस्त जाणीव, प्रेम, दया, सहानुभूती यांचा संगम असलेल्या परिचारिका मानवजातीच्या सेवेचे वृत्त ...

Patient service is a life-giving task - Purushottam Jaipuria | रुग्णसेवा हे जीवनदायी कार्य - पुरुषोत्तम जयपुरिया

रुग्णसेवा हे जीवनदायी कार्य - पुरुषोत्तम जयपुरिया

Next

जालना : वैयक्तिक भावना बाजूला ठेवून, लोकहिताची जबरदस्त जाणीव, प्रेम, दया, सहानुभूती यांचा संगम असलेल्या परिचारिका मानवजातीच्या सेवेचे वृत्त घेऊन कार्यरत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांसाठी केलेले पुण्यवंत कार्य खचलेल्यांसाठी जीवनदायी आहे, असे गौरवोद्गार लायन्स क्लबचे उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी केले. प्रथम परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन अर्थात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून जालना लायन्स क्लब परिवारातर्फे बुधवारी कोरोना योद्धा असलेल्या ४२ परिचारिकांचा रोगप्रतिकारक शक्तीयुक्त मिठाई व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी माजी प्रांतपाल विजय बगडिया, श्याम लोया, सुभाष देविदान, रामकुंवर अग्रवाल, अरुण मित्तल, ला. सतीश संचेती, विनोद कुमावत, डुगंरसिंह राजपुरोहित, विनोद पवार, द्वारकादास मुंदडा, गिरीश पाकणीकर, डॉ. श्रीमंत मिसा, डॉ. कायंदे, वाघमारे, राजेश फटाले आदींची उपस्थिती होती.

जयपुरिया पुढे म्हणाले, आम्हाला आरोग्यविषयक उपक्रम घेताना परिचारिकांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी लाभते. समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या परिचारिकांप्रति कृतज्ञता व्यक्त व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे याच भावनेतून आमचा अल्पसा प्रयत्न आहे. श्रीमंत मिसाळ म्हणाले, येथील परिचारिका गेल्या वर्षभरापासून प्रचंड मेहनत घेत असून, अनेक कोविडग्रस्त रुग्णांना त्यांच्या अथक परिश्रमांमुळे सुखरूप घरी जाता आले, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ला. सतीश संचेती यांनी केले तर अरुण मित्तल यांनी आभार मानले.

Web Title: Patient service is a life-giving task - Purushottam Jaipuria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.