राणी उंचेगाव शाखेत १६ लाखांचा फळपीक विमा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:46 AM2018-06-18T00:46:57+5:302018-06-18T00:46:57+5:30
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली.
प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विम्याचा भरणा इन्शुरन्स कंपनीने करून घेतला आहे. गुरुवारी हा मोसंबीचा विमा भरण्याचा शेवटचा दिवस होता. राणी उंचेगाव जि.म. बँक शाखेच्या अंतर्गत १४ गावांमधील शेतक-यांनी सकाळपासून विम्याचा भरणा करून घेण्यासाठी गर्दी केली होती. ३ हजार ८५० रुपये प्रति हेक्टरीचा विमा भरणा होता. मोसंबीची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ७७ हजार रुपये आहे. बँक शाखेकडून विमा भरण्यासाठी शेतकरी वंचित राहू नये म्हणून उशिरापर्यंत विम्याचा भरणा करून घेतला.
८८ लाखांचा फळपीक विमा प्राप्त
मागील वर्षी मोसंबीचा जून २०१७ आणि जुलै २०१७ डाळींबाचा विमा भरणा केलेल्या शेतकºयांचा ८८ लाख १० हजार रुपयांचा विमा शाखेला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाल्याची माहिती शाखेचे व्यवस्थापक जाधव यांनी दिली. राणीउंचेगाव शाखेमध्ये जून २०१७ मध्ये ९१ शेतकºयांनी मोसंबी फळपीक विमा भरलेला आहे. तर डाळिंबाच्या १११ शेतक-यांनी विम्याचा भरणा केला आहे.
मोसंबीसाठी ७० हजार रुपयाने हेक्टरी शेतक-यांना प्राप्त झाला आहे तर डाळिंबासाठी ५० हजार रुपये हेक्टरने विमा प्राप्त झाला आहे. शाखेला प्राप्त झालेल्या फळपीक विम्याचे वाटप लवकरच सुरू करण्यात येईल, असे शाखा व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले.
बँकेच्या सहकार्यामुळे शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.